मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवीन रेशन कार्ड आले, पहा कसे मिळवायचे ? Reshan card new maharashtra

Reshan card new maharashtra : नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये रेशन कार्ड हे तुमचे रहिवासी पुरावा म्हणून सुद्धा धरला जातो आणि ओळखीचा पुरावा सुद्धा धरला जातो. या रेशन कार्ड वर अनेक सरकारी योजना असतात त्या तुम्हाला मिळत असतात.

त्याच्यामुळे रेशन कार्ड चे महत्व व साधारण आहे. ज्यांच्या- ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना आयुष्मान भारत योजना अंतर्गत 05 लाखापर्यंत मोफत दवाखाना सुद्धा मिळतो.

तसेच तुम्ही जर महाराष्ट्रातील रहिवासी असाल तर फक्त या रेशन कार्ड वर तुम्हाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळतो तसेच मुख्यमंत्री सहायता निधी योजनेचा सुद्धा लाभ मिळतो. आणि सोबतच तुम्हाला शासकीय धान्य सुद्धा मिळते.

मित्रांनो महाराष्ट्र मध्ये या रेशन कार्ड बरेच बरेच योजना अवलंबून असतात. महाराष्ट्रात कोणतीही योजना पहा किंवा कोणते कागदपत्रे, दाखले काढण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड लागतेच. मग ते रेशन कार्ड पिवळे असो, केशरी असो किंवा शुभ्र असो ते लागतातच !

मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाने 2018 पासून ची नवीन स्मार्ट रेशन कार्ड पद्धत अवलंबली आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.

कारण रेशन कार्ड एका पुस्तकाप्रमाणे आहे आणि ते रेशन कार्ड पुस्तक नेहमी आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही ही बाब लक्षात घेता ! शासनाने स्मार्ट रेशन कार्डची पद्धत वापरली आहे.

ही पद्धत अनेक वर्षापासून महाराष्ट्र मध्ये चालू आहे पण फारसा यावर सरकारी अधिकारी लक्ष देत नाही. आपण हे स्मार्ट रेशन कार्ड कसे काढायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

स्मार्ट रेशन कार्ड पद्धती 2018 पासून सुरू झालेली आहे तुम्हाला जर हे स्मार्ट रेशन कार्ड काढायचे असेल तर https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्मार्ट रेशन कार्ड तयार करू शकता. हे रेशन कार्ड तुम्हाला तिरंगा प्रकारचे रेशन कार्ड मिळेल तिरंगा मध्ये तीन कलर यामध्ये पिवळे, केशरी आणि शुभ्र अशा प्रकारचे कलर असतात.

पिवळे रेशन कार्ड : हे पिवळे रेशन कार्ड किंवा शिधापत्रिका यामध्ये दारिद्र रेषेखालील कुटुंबे येतात

केशरी रेशन कार्ड : या रेशन कार्ड मध्ये 15,000 रुपये उत्पन्नाची मर्यादा आहे.

शुभ्र रेशन कार्ड : वार्षिक 01 लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबासाठी हे शुभ्र रेशन कार्ड दिले जाते.

महाराष्ट्रात स्मार्ट रेशन कार्ड तयार करण्यासाठी पात्रता

  • स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी शासनाने काही मर्यादा दिल्यात त्याबद्दल आपण पाहू ज्या कुटुंबाचे 1997 ते 98 दरम्यान वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 15000 पेक्षा कमी आहे त्या कुटुंबांची नावे या स्मार्ट रेशन कार्ड मध्ये आहेत.
  • स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी त्या कुटुंबातील कोणीही हे करदाते नसावे तसेच जीएसटी भरणारे नसावे.
  • मार्गदर्शन करताना त्या कुटुंबाकडे टेलिफोन किंवा चार चाकी वाहन नसावे तसेच डॉक्टर, वकील, किंवा सीए असावे. ही अट जुनी आहे.
  • कुटुंबाकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी तरच तुम्हाला हे स्मार्ट रेशन कार्ड दिले जाते.

स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • मतदार ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट ( असेल तर )
  • विज बिल ( पत्त्यासाठी )
  • वास्तव्याचा पुरावा.

स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज प्रक्रिया

  1. स्मार्ट रेशन कार्ड महाराष्ट्र मध्ये जर तुम्हाला काढायचे असेल तर तुम्हाला आधी https://mahafood.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल.
  2. त्यानंतर ऑनलाईन एप्लीकेशन म्हणून यावर क्लिक करायचे आहे.
  3. ऑनलाइन एप्लीकेशन मध्ये मी आधार कार्ड मार्फत तुम्ही लॉगिन करू शकता.
  4. लॉगिन केल्यानंतर सर्व कुटुंबाची माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  5. माहिती भरल्यानंतर सेव save बटणावर क्लिक करायचं आहे.
  6. त्यानंतर तो तुम्हाला स्मार्ट रेशन कार्ड Print Preview दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही सेव करू शकता आणि स्मार्ट कार्ड मध्ये बनवू शकता. तुम्हाला काही दिवसातच सरकार मार्फत नवीन स्मार्ट कार्ड घरी येईल.
  7. अशा प्रकारे अर्ज करून तुम्ही स्मार्ट रेशन कार्ड सरकारकडून घेऊ शकता. आणि हे स्मार्ट रेशन कार्ड, पॅन कार्ड च्या साईज एवढेच आहे त्यामुळे तुम्ही ते खिशामध्ये सुद्धा वापरू शकता. या स्मार्ट कार्ड वर तुमचा फोटो, मोबाईल नंबर, नवीन SRC number डिजिटल रेशन कार्ड नंबर, तुमचा जिल्हा, पुरवठा विभागाची डिजिटल सही त्यानंतर तुमचे गाव, तालुका आणि जिल्हा ही माहिती त्यामध्ये असते.

Leave a Comment