मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सातबारावर आता आईचे नाव लागणार मोठा निर्णय Mother’s name will also be added on Satbara

Mother’s name added on Satbara : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता सातबारा मध्ये मोठा बदल होणार आहे. तुम्ही पाहिले असेल काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता. Mother’s name added on Satbara सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव इथून पुढे लागणार आहे. आता भूमी अभिलेख या विभागाने सुद्धा एक मोठा निर्णय घेतला आहे. आता इथून पुढे सातबारा सुद्धा आईचे नाव समाविष्ट होणार आहे. अर्जदाराच्या नावा नंतर आता आईचे नाव सुद्धा येणार आहे.

सातबारावर आता आईचे नाव लागणार Mother name in Satbara Utara

मित्रांनो काही दिवसापूर्वी राज्य सरकारने मुलाच्या नावानंतर आईचे नाव लावण्या संदर्भात मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर आता भूमी अभिलेखाने सुद्धा अर्जदाराच्या नावानंतर आता “ सातबारावर आता आईचे नाव लागणार ” आहे. त्या संदर्भात आता संगणकामध्ये बदल करण्याचे प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे.

भूमी अभिलेख यांच्यामार्फत सांगण्यात येत आहे की काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे असे सांगण्यात येत आहे. Mother’s name added on Satbara सहा महिन्याचा कालावधी यासाठी लागणार आहे.

प्रकल्प राज्य संचालक सरिता नरके यांनी याबाबत सांगितले आहे की 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमिनी खरेदीचे तसेच उताऱ्यावर अर्जदाराचे नाव आले असेल तर त्यांच्या नावानंतर आईचे नाव लागणार आहे. सरिता नरके म्हणाले की, 01 मे 2024 नंतर ज्या बालकांचा जन्म झाला आहे, त्यांचे रेकॉर्ड तयार व्हायला काही वर्षाचा कालावधी लागणार आहे मात्र जर आत्तापासूनच आपण आईचे नाव त्याच्यामध्ये रकान्यामध्ये टाकले तर अर्जदाराचे नाव बरोबरच आईचाही लोकांना तयार होईल. Mother’s name added on Satbara ही पूर्ण प्रोसेस व्हायला सुमारे तीन ते सहा महिने एवढा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

कोणते पुरावे लागणार आहेत Mother name in satbara document ?

  • 01 मे 2024 नंतर नावे टाकताना त्यांचे नाव सोबत आता आईचे नाव सुद्धा लागणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या.
  • आईचे नाव लागण्यासाठी किंवा रकान्यामध्ये येण्यासाठी ती महिला त्याची आई असल्याबाबत पुरावा द्यावा लागणार आहे.
  • याची चौकशी तलाठी मार्फत होऊन नंतरच त्या व्यक्तीच्या नावावरून किंवा बालकाच्या नावावर लागणार आहे.

विवाहित महिलांबाबत पद्धत काय आहे ?

  • पद्धत ही प्रचलित पद्धतीनुसारच सध्या असणार आहे.
  • तिचे लग्नानंतरचे नाव त्यानंतर तिच्या पतीचे नाव आणि त्यानंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्या ची प्रक्रिया असणार आहे.
  • महिलेचे लग्नापूर्वीचे नाव मालमत्ता दस्तावेज मध्ये नोंदवण्याची मुबारक आहे.

Leave a Comment