नमस्कार, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ या योजनेअंतर्गत फक्त जे बांधकाम कामगार आहेत तसेच इतर कामगार आहेत यामध्ये पेंटर आहेत , खाणकाम करणारे आहेत , वेल्डर आहेत या सर्वांनाच या योजनेचे लाभ मिळत होता. मुळात कामगार ही संकल्पना खूप मोठी असल्याने त्याच्यामध्ये असंघटित कामगार हा शब्द टाकलेला नव्हता. Maharashtra Rajya Asanghati Kamgar Kalyan Mahamandal त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडे असंघटित कामगार महामंडळ स्थापनेचा प्रश्न राहिलेला होता. आणि वारंवार विविध संघटने कडून, खाजगी एनजीओ कडून आणि जे कामगार आहेत त्यांच्याकडून असंघटित कामगार महामंडळ स्थापन करावे यासाठी मोठ्या प्रमाणावर सूचना सुद्धा आल्या होत्या.
असंघटित कामगार म्हणजे कोण ही व्याख्या खूप मोठी आहे. यामध्ये सर्व क्षेत्रातील लोक समाविष्ट होतात. जे संघटित नाही व ज्यांच्या हक्कासाठी कोणी लढत नाही ते सर्व असंघटित कामगार म्हणून येतात Maharashtra Rajya Asanghati Kamgar Kalyan Mahamandal . यामध्ये शेतमजूर , ड्रायव्हर, खाजगी ठिकाणी काम करणारे सर्व लोक स्टाफ, चित्रपटात काम करणारे कामगार, होमगार्ड, मॉडेल ऍक्टर, फोटोग्राफर, बिडी कामगार , गाड्या धुणारे, डबेवाले, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवणारे, चिकन कापणारे, पशुपालन करणारे, आपले सरकार सेवा केंद्र चालक, शेअर मार्केट ब्रोकर, पेंटर, बांधकाम कामगार, गवंडी, शिक्षक, गीतकार, डान्सर, दळण दळणारे, पानवाला, फ्रुट वाला, नेटवर्किंग चालवणारे, किराणा दुकान चालवणारे जेवढे जेवढे असंघटित क्षेत्रात काम करतात ते सर्व या असंघटित कामगार महामंडळाकडे नोंदणी करू शकतात.
