मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खरीप पिक विमा मंजूर होणार

Kharip crop insurance : नमस्कार शेतकरी बंधूंनो, पीक कापणीच्या अहवालानुसार महाराष्ट्र मध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप पिके मूग, बाजरी तसेच उडीद, सोयाबीन या पिकाचे उत्पन्न 50 टक्के पेक्षा घटले होते. यासंदर्भात माहिती विविध वृत्तपत्रांमध्ये सुद्धा आली होती. फक्त सरकारने सोयाबीन या पिकाचा विमा 12 ते 14 टक्के टक्के मंजूर केला होता. पण इतर पिके आहेत जसे ‘बाजरी झाली, मूग झालं किंवा उडीद ‘ त्या पिकाचा पिक विमा सरकारने मंजूर केलेला अजून पण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे

Kharip crop insurance : मागील वर्षीचा काळ हा कमी पावसाचा होता. मागील वर्षी ‘ एल निनो El Nino ‘ चा प्रभाव जास्त होता. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस राज्यामध्ये पडला होता. खरीप हंगामामध्ये पाऊस वेळेवर न झाल्यामुळे अनेक पिकांची नुकसान झाले होते. यामध्ये बाजरी, मग, उडीद आणि सोयाबीन हे त्यामध्ये प्रमुख पिके होती. ज्यावेळी पिकाची कापणी झाली, पीक कापणीच्या अहवालानुसार या पिकाचे उत्पन्न 50 टक्के पेक्षा जास्त घटले होते. सहजिकच मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांचे नुकसान झाले होते. शासनाने ही मदत करणार असल्याचे सांगितले होते.

Kharip crop insurance 2023 : आता खरीप हंगाम संपून रब्बी हंगामाची कापणी सुद्धा संपत आली आहे तरीही केंद्र सरकारकडून पिक विमा चा दुसरा हप्ता आलेला नाही. काही दिवसापूर्वी राज्य शासनाने 24 जिल्ह्यांमध्ये 50 लाख 94 हजार 467 शेतकऱ्यांना अग्रीम पिकाचे ( अग्रीम पीक विमा) हा 25 टक्के जाहीर केलेला आहे त्यानुसार 226 कोटी रुपयांची वाटपही करण्यात आले.

पण केंद्रातून येणारा दुसरा हप्ता अद्याप आले नसल्याकारणाने शेतकऱ्यांना तो देण्यात आलेला नाही. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडे या पिक विमा हप्त्या संदर्भात विचारणा केलेली आहे. तर लवकरच हा खरीप 2023 पिक विमा मंजूर होणार आहे.

Leave a Comment