मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात सापडल्या प्राचीन भव्य दुर्मिळ मुर्त्या 12 व्या ते १३व्या शतकातील असल्याचा दावा, पहा in pandharpur found old idols in basement area, see !

in pandharpur found old idols in basement area पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर महाराष्ट्र-कर्नाटक आणि भारतातील करोडो लोकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या पंढरपूरच्या मंदिराचे सुशोभीकरणाचे काम चालू आहे. या सुशोभीकरणाच्या दरम्यान अनेक नवीन उलगडे उघडलेले आहेत. नवीन नवीन माहिती समोर येत आहे. नुकतेच सुशोभीकरणाचे काम चालू असताना एक नवीन तळ घराचा शोध लावला यामध्ये दुर्मिळ अशा मूर्ती सापडल्या तसेच नाणी आणि बांगडी सापडल्या. तर आपण याबद्दल माहिती पाहू.

पंढरपूरचे विठ्ठलाचे मंदिर करोडो लोकांचे श्रद्धास्थान आहे. तुम्ही कधी ना कधी पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटायला गेले असणारच !. सध्या या प्राचीन मंदिराचे सुशोभीकरणाचे काम चालू आहे. दीड दोन महिन्यापासून हे काम चालू आहे आता या कामाच्या दरम्यान अनेक अनेक वस्तू सापडले. मंदिराचे काम शुशोभीकरणाचे शेवटच्या टप्प्यांमध्ये असताना एक नवीन तळघराचा शोध लावला. हे तळघर काय आहे यामध्ये काय आहे याचा शोध घेतला असता या आठ आठ फुटाच्या तळघरांमध्ये अनेक दुर्मिळ मुर्त्या सापडल्या, नाणी सापडल्या तसेच बांगड्या सुद्धा सापडल्या अशी माहिती आपल्याला पुरातत्त्व विभागाचे संचालक विलास वाहने यांनी मीडिया समोर माहिती दिली.

मंदिरात काय काय सापडले ?

सुशोभीकरणाचे काम चालू असताना या आठ फुटाच्या तळघरामध्ये उतरून गेल्यानंतर जे पुरातन विभागाच्या अधिकारी आहेत यांना एकूण सहा मुर्ती सापडल्या यामध्ये चार ते साडेचार फुटाच्या दोन विष्णू अवतारातील मुर्त्या सापडल्या या मुर्त्या व्यंकटेश्वराच्या मुर्त्या तसेच महिषासुर मर्दिनीची मूर्ती यासारखे आहेत. त्यानंतर इतर लहान मुर्त्या सापडल्या. पण या मुर्त्या ज्या चार ते साडेचार फुटाच्या आहेत या विठ्ठ लाशी संदर्भात नाही. या मुर्त्या भगवान विष्णू आणि महिषासुर मर्दिनीसारखे मूर्ती आहे.

या सर्व मुर्त्या दगडी स्वरूपात आणि जीर्ण स्वरूपामध्ये आहेत. बाराव्या तेराव्या शतकामध्ये या मुर्त्या या मंदिरात असण्याची शक्यता आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. जीर्ण स्वरूपात झाल्याकारणाने या मुर्त्या तळ घरात ठेवण्यात आल्या असाव्या अशी शक्यता पुरातन खात्याकडून महत्त्वाची जात आहे. पण यांचे मंदिर नक्कीच शेजारी कुठेतरी असणार आहे अशी सुद्धा माहिती समोर येत आहे

Leave a Comment