जून 2024 बैठकीचे प्रमुख ठळक मुद्दे
rbi monetary policy live updates भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी 07 JUNE जाहीर केलेल्या द्वि-मासिक पतधोरणाचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत :
- मुख्य व्याज दर (रेपो) – ६.५% वर कायम ( ८ ऑगस्ट पर्यंत )
- फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात शेवटची वाढ करण्यात आली होती. आता यामध्ये बदल नाही
- चलनवाढ कमी करण्यासाठी अनुकूल चलनविषयक धोरण मागे घेण्यावर भर दिला
- FY – 25 साठी वाढीचा अंदाज 7% वरून 7.2% वर वाढला
- FY – 25 साठी महागाईचा अंदाज 4.5% वर कायम
- अन्नधान्य महागाई अजूनही चिंतेची बाब आहे असे सांगितले
- FY – 25 साठी चालू खात्यातील तूट शाश्वत पातळीवर चांगली राहण्याची अपेक्षा आहे
- 31 मे 2024 रोजी परकीय चलनाचा साठा हा $ 651.5 अब्जच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे माहिती दिली.
- बल्क डिपॉझिट थ्रेशोल्ड ₹ 2 कोटींवरून ₹ 3 कोटी करण्यात आला.
- फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (FEMA) अंतर्गत निर्यात आणि आयातीचे नियम तर्कसंगत केले जातील असे सांगितले.
- RBI पेमेंट फसवणूक धोके कमी करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म स्थापित करेल
- शिल्लक फास्टॅग, एनसीएमसी आणि यूपीआय-लाइट वॉलेट्सची स्वयं भरपाई ई-आदेश फ्रेमवर्क अंतर्गत आणली आहे
- 8 ऑगस्ट रोजी पुढील पतधोरणाची घोषणा.
01 जून पासून सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात केले मोठे बदल पहा
RBI धोरण: गृहकर्जावर परिणाम
- कर्जदारांना कर्जावरील उच्च व्याजदरांचा सामना करावा लागू शकतो.
- रेपो दर थेट कर्जदरांवर प्रभाव टाकत असल्याने, न बदललेला दर म्हणजे विद्यमान कर्जे 6.5 टक्क्यांच्या एलिव्हेटेड रेपो रेटवर बेंचमार्क राहतील,
- नवीन कर्जे पेक्षा कमी स्प्रेडसह ऑफर केली जाण्याची शक्यता आहे.
- जुनी कर्जे भविष्यातील कोणत्याही दरात कपात केल्यास दर कमी होतील,
- त्यामुळे कर्जदारांना भरावे लागणारे EMI कमी होईल.
