Monsoon Maharashtra update : आता मॉन्सून मध्य अरबी- समुद्र, कर्नाटकच्या आणखी काही भागात त्यानंतर गोव्यात आलेला आहे. दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र सह, तेलंगणा या भागात पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे.
लोकसभा २०२४ निवडणुकीच्या मतमोजणीला वरुण राजाने आता हजेरी लावली आणि विजयी उमेदवारांचा आनंद द्विगुणित केला. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी पावसातही मोठा आनंदोत्सव साजरा केला. सकाळपासून प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना सायंकाळी वरुणराजाने दिलासा दिला.
आकाशात आता ढगांची गर्दी झाली आणि जोरदार सरींची बरसात सुरु झाली आहे. त्यामुळे काही मिनिटांमध्येच रस्ते पाण्याखाली गेले. मॉन्सून केरळ मधून आता पुढे सरकला असून, लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तत्पूर्वी मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज राज्यासह पुण्यात देण्यात आला आहे.
पुण्यात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पावसानेअनेक ठिकाणी धडक दिली. शहरातील, शिवाजीनगर, बिबवेवाडी, धनकवडी, घोरपडी, स्वारगेट, कर्वेनगर, मार्केट यार्ड, , एरंडवणा, सातारा रोड, सहकारनगर, पर्वती, सिंहगड रोड या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. शहरभर पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांना आता उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात या ठिकाणी पावसाचा अंदाज, पहा
कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच ते सहा दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात मध्ये पुणे, नगर, तसेच सोलापूर आणि सातारा कोल्हापूर या जिह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच मराठवाड्या मध्ये पुढील पाच -सहा दिवस धाराशिव, संभाजी नगर , बीड, जालना, हिंगोली, लातूर, नांदेड आणि परभणी येथे तुरळक पाऊस होईल असा अंदाज दिला आहे. विदर्भातही सर्व जिल्ह्यांमध्ये आता पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मॉन्सून कुठे पोहोचला?
मॉन्सून आता मध्य अरबी समुद्र, तसेच कर्नाटकच्या आणखी काही भागात, आणि आता गोव्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र सह तेलंगणा या भागात पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात गड गडाटीचा पावसासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
