मित्रानो सरकारी ऑफिस मध्ये आपले अनेक कामे असतात. असे बऱ्याचदा होते की आपण सरकारी ऑफिस किंवा त्यांच्या सलग्न ऑफिस मध्ये गेल्यावर आपले काही कामे असतील तर तेथे जाणून बुजून टाळाटाळ केली जाते किंवा सलग पुढची तारीख दिली जाते किंवा मोठ्या प्रमाणावर टाळाटाळ केली जाते. आपण अश्या गोष्टी मुळे खूप वैतागून जातो आणि कोणाकडे दाद मागावी या संदर्भात नेहमी सभ्रमात असतो.
मित्रानो जर तुम्हाला सरकारी ऑफिस मध्ये तुमच्या कामाबाबत टाळाटाळ करत असेल तर तुम्ही देशाचे पंतप्रधान ऑफिस PMO मध्ये याची थेट तक्रार करू शकता. एक अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच या संदर्भात तुमच्या तक्राराची पूर्ण माहिती मिळेल आणि तक्रार जर योग्य असेल तर तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल.
PMO office मध्ये तक्रार कशी दाखल करावी
मित्रानो जर तुम्हाला PMO OFFICE पंतप्रधान ऑफिस मध्ये तक्रार करायची असेल तर खाली दिल्या प्रमाणे तक्रार आणि steps पाहू शकता.
1) सुरुवातीला पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे किंवा लिंक वर जायचे आहे.
https://www.pmindia.gov.in/en/interact-with-honble-pm/
( Choose the option – Write to the Prime Minister )
https://pmopg.gov.in/citizenreforms?language=hi

2 ) त्यानंतर मोबाईल नंबर टाकून , otp घेऊन तसेच captcha fill करून तुम्ही log in करून घ्या.

3 ) लाँग इन झाल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला अनेक option दिसतील त्यापैकी Lodge Public Grivevance हा पर्याय घेयचा आहे त्यावर क्लिक केल्यावर समोर agree करण्यासाठी टिक मार्क करून Submit करायचा आहे.
4 ) त्यानंतर सर्व department दिसतील तुमची जर कोणत्या department संदर्भात तक्रार असेल तर ते निवडायची आहे , जर state मधील department असेल तर State goverment हा option घेऊन येथे थोडक्यात पण महत्वाच्या बाबी येथे टाकून तक्रार करू शकता.
